Share

Kishori Pednekar | तुमच्या बापाचं नाव तुमच्या आईला विचारायला जायचं का?, किशोरी पेडणेकर कदमांवर संतापल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप करत असतात. अशातच शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. याला आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

ज्या रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी मोठं केलं. त्यांच्याच बाबतीत अशी भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अशी भाषा वापरायची असेल तर बरं झालं आमच्या पक्षातून ही घाण निघून गेली. सहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंचे आभार मानणारे वक्तव्य करणारे रामदास कदम असे कसे बोलू शकतात. बाळासाहेबांनी विश्वास टाकला आणि यांच्या मुलाला आमदार केलंत. बाळासाहेब ऐकत नव्हते तर वहिनींकडे जाऊन मस्का मारायचे. पण आज किचनपर्यंत जाण्याची यांची जीभ सैल सुटली. एवढा लाळघोटेपणा करणारा नेता गेला.. बरं झालं घाण गेली’, असं वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी केलंय.

तर यानंतर पुढे ‘राज्यपालांकडील 12 आमदारांमध्ये आमदारकी मिळावी, म्हणून रामदास कदमांचे हे प्रयत्न सुरु आहेत. एवढं वाटत होतं तर तुमच्या मुलाला आमदार का बनवलंत? तुमच्या बापाचं नाव तुम्हीच लावताय नं… मग आम्ही तुमच्या आईला तुमच्या बापाचं नाव विचारायला जायचं का? काय चाललंय का?’ असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.

रामदास कदम काय म्हणाले होते ?

मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का?, असा खोचक सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला.त्यावेळी शिंदे गटातील नेते रामदास कदम दापोली येथील सभेत बोलत होते.

पुढे रामदास कदम बोलताना म्हणाले की, आम्ही कधी नाही म्हटलं आहे का उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कधी कोणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?,असे अनेक सवाल कदमांनी उद्धव ठाकरेंना केलेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!