मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे. मात्र यावरच आता काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोदींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
काळे कृषी कायदे मागे घेणे हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतला. पण या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण? असा सवाल करत त्यांनी अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी. अशी मागणी केली आहे.
काळे कृषी कायदे मागे घेणे हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतला. पण या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण? तसेच अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी. #FarmLaws
— Prithviraj Chavan (@prithvrj) November 19, 2021
दरम्यान आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान तो संसदेद्वारे मागे घेतला जाईल अशी घोषणा मोदींनी केली आहे. आज सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झिरो बजेट शेती अर्थात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, देशाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने पीक पद्धतीत बदल करणे. एमएसपी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी, भविष्याचा विचार करून अशा सर्व विषयांवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ यांचे प्रतिनिधी असतील. अशी घोषणाही मोदींनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘आंदोलन मागे घेतले जाणार नाही, जोपर्यंत..’, टिकैत यांचा मोदींना इशारा
- शरद पवारांनी ‘हा’ दुतोंडीपणा बंद करावा- अतुल भातखळकर
- ‘…म्हणून तुम्ही रोहित शर्मा, विराट कोहली किंवा केएल राहुलला बाहेर काढू शकत नाही’
- ‘..हा मोदी सरकारच्या अत्याचारावर शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा आणि एकजुटीचा विजय’
- शरद पवारांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचं सडेतोड उत्तर


