🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तातडीने आयपीएल स्पर्धा स्थगित केली. स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. मात्र नुकत्याच इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र विजय हजारे ट्रॉफी पासून फॉर्मात असलेला पृथ्वी शॉला मात्र संघात स्थान मिळाले नाही.
पृथ्वी शॉ आपल्या शानदार बॅटिंगने तर नेहमी चर्चेत असतोच पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोक चर्चा करत असतात. पृथ्वी टीव्ही स्टार प्राची सिंगला डेट करत असल्याच्या सध्या जोरदार चर्चा चालू आहेत. प्राचीही अनेकवेळा पृथ्वीचं कौतुक करताना दिसली आहे. आयपीएलमधील पृथ्वीच्या दमदार कामगिरीनंतर तीन अनेकवेळा इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून पृथ्वीचं कौतुक केलं आहे.
https://www.instagram.com/p/CPDs3iHnppf/?utm_source=ig_web_copy_link
मात्र यावेळी तिने पृथ्वी शॉचं कौतुक केलं म्हणून चर्चेत नव्हे तर तिने इन्स्टाग्रामवर तिचा एक डान्सचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत ती डान्स करताना दिसून येत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या व्हिडीओत प्राची फिल्म ‘धन धना धन गोल’ चित्रपटातील ‘बिल्लो रानी’ (या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. या गाण्यातील तिच्या अदा चाहत्यांना भुरळ घालत आहेत. या व्हिडीओला तिने’बॉली-मूड’असं कॅप्शन दिलंय. यात तिचं नृत्य बघून चाहते कौतुक करत आहेत. यापूर्वी देखील प्राची तिच्या डान्स व्हिडीओमुले बरीच चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी आक्रोश मोर्चाला बीडपासून सुरुवात
- म्यूकरमायकोसिसचे औषधे अल्पदरात द्या; खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
- गेवराईत नियमांचे उल्लंघन करणारे चार दुकाने सील
- सावधान! रक्त तपासणीच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट सुरू
- रात्रीस खेळ चाले! परतूरमध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
