औरंंगाबाद : झोपेतच एका कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास हर्सूल मध्यवर्ती कारागुराहात घडली आहे. दीपक शामा पवार (वय ३६, रा. हर्सूल कारागुह ) असे मृत्यू कैद्याचे नाव आहे.
दीपक हा कच्चा कैदी होता. तो शनिवारी रात्री जेवण करून त्याच्या बॅरिकेत नंबर १३ मध्ये झोपी गेला होता. मात्र, पहाटे अडीच वाजता तो बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कारागुह प्रशासनाने त्यांना घाटी रुग्णालयात आणले होते.
मात्र, डॉक्टरांनी पहाटे साडे तीन वाजता तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हर्सूल पोलीस करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड
- ‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल
- राजकीय खळबळ! ‘पेगासस’च्या मदतीने ३०० प्रतिष्ठित नागरिकांवर केंद्राची हेरगिरी
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

