नवी दिल्ली : ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे नाशिक मधील झाकीर हुसैन रुग्णालयात २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुर्देवी घटनेत मृत पावलेल्या रुगांच्या नातेवाईकांचेही त्यांनी सांत्वन केले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेत रुग्णांचा मृत्यू झाला असून ही घटना ह्दय पिळवटून टाकणारी असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. या घटनेत जीवीत हाणी झाल्यामुळे मन अस्वस्त झाले आहे, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचेही सांत्वन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
The tragedy at a hospital in Nashik because of oxygen tank leakage is heart-wrenching. Anguished by the loss of lives due to it. Condolences to the bereaved families in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021
या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे नाशिकच नाही तर राज्यातील सर्व रुग्णालयांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण, राहुल गांधींची टीका


