Share

महाराष्ट्राच्या कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता

Published On: 

नवी दिल्ली : २०१९ च्या अखेरीस कोरोना व्हायरसचे विविध देशांमध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. यानंतर २०२० च्या फेब्रुवारीनंतर जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. यानंतर, अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट देखील आली. भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेहून दुसऱ्या लाटेमुळे अधिक मनुष्यहानी झाली. महाराष्ट्रासह केरळमध्ये दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आले असून या राज्यांत ही लाट पूर्णपणे निवळलेली नाही. अशातच तिसऱ्या लाटेचा धोका उंबरठ्यावर आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी देशातील कोरोना संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत त्यांनी सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणाऱ्या राज्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशामध्ये कोरोना स्थिती आटोक्यात येत असताना महाराष्ट्र आणि केरळमध्ये मात्र कोरोना रुग्णांमध्ये काहीशी वाढ होत आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना संसर्गावर वेळीच उपाय केले नाहीत तर गंभीर परिस्थिती ओढवेल. महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रारंभ ज्या प्रदेशातून झाला, तेथे अन्य प्रदेशांच्या तुलनेत स्थिती नियंत्रणात राहिल असा तज्ज्ञांचा अंदाज होता. पंरतु, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये होणारी कोरोना रुग्णवाढ अतिशय गंभीर असून संपूर्ण देशासाठी तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता या दोन राज्यांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी सूचना देखील मोदींनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!