🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होत.
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच विविध नेत्यांनी त्यांची विचारपूस केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांची फोनद्वारे विचारपूस केली होती. त्यांनतर पवारांनी मुख्यमंत्र्यांचे ट्विट आभार देखील मामले होते. त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार यांच्या तब्बेती विषयी विचारपूस केली आहे.
याबाबत शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून माहिती देण्यात आली आहे. ‘धन्यवाद, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या बद्दल !’ असे या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
Thank you Honourable Prime Minister Shri @narendramodi ji for your good wishes for my speedy recovery!@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
दरम्यान, सध्या शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीयदृष्टय़ा कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील’
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

