Share

पंतप्रधान मोदींच्या ‘शून्य उत्सर्जन’ घोषणेचे ब्रिटिश पंतप्रधानांकडून स्वागत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या समतोल वापरातून २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली आहे. मोदींच्या या घोषणेचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वागत केले आहे. ग्लासगो येथील जागतिक परिषदेत सोमवारी पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका मांडताना ही घोषणा केली असून भारताकडून तसं पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलं आहे.

भारताने २०३० पर्यंत आपली इंधनाची निम्मी गरज अपारंपरिक ऊर्जेतून भागविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यातून कार्बनचे उत्सर्जन कित्येक अब्ज टनांनी कमी होणार आहे. जगभरात हवामान बदल रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यामुळे मोठी मदत होणार आहे, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हंटल आहे.

२०३० पर्यंत भारताची इंधनाची निम्मी गरज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून भागविली जाईल, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्याची पंचसूत्री मोदी यांनी ग्लासगो परिषदेत मांडली. त्यात २०३० पर्यंत भारताची जिवाश्मरहित इंधननिर्मितीची क्षमता ५०० गिगावॉटपर्यंत वाढविण्याचे सूतोवाच केले आहे. या कालावधीपर्यंत भारतात अपेक्षित असलेल्या कार्बन उत्सर्जनात एक अब्ज टनांची घट करण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!