Share

ASSOCHAM च्या स्थापनेला 100 पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने गौरव 

Published On: 

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे असोचॅम (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया) च्या फाऊंडेशन वीकच्या निमित्ताने बोलणार आहेत. गुरुवारी पीएमओच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली होती. त्यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कि पंतप्रधान मोदी आज काय बोलतील.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी फाउंडेशन सप्ताच्या निमित्ताने रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड’ देखील प्रदान करणार आहेत. टाटा समूहाच्या वतीने ते हा पुरस्कार घेतील. या खास सोहळ्याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

असोचॅमची (ASSOCHAM) स्थापना 1920 मध्ये देशातील सर्व प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवर्तक मंडळे यांनी केली होती.  ही संस्था प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली. यामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.  या संस्थेमध्ये 400 हून अधिक चेंबर्स आणि कामगार संघटनांचा समावेश आहे. देशभरात याचे साडेचार लाखाहून अधिक सभासद आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!