🕒 1 min read
पुणे : पिरंगुट एमआयडीसी मधील येथील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत अनेक मजूर अडकून पडले होते. आगीत कंपनीतील काही कामगार बेपत्ता असून १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न बराच वेळ सुरु होते.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल.
महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2021
दरम्यान, या दुर्घटनेमुळे संबंध महाराष्ट्रातून शोक व्यक्त करण्यात येत असून याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली आहे. ‘महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना,’ असं ट्विट करून त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रात पुण्यातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकास 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून' 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.
— PMO India (@PMOIndia) June 7, 2021
यासोबतच, ‘आगीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकास ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून’ 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे,’ अशी घोषणा देखील पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा जाणून-बुजून डाव; निलेश राणेंचा गंभीर आरोप
- ‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’
- मोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले
- विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’
- आम्ही अडचणीत, आम्हाला मदत करा; छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
