Share

पंतप्रधान मोदींनी केले पुन्हा एकदा दिवे पेटवण्याचे आवाहन; म्हणाले, ‘भगवान रामही आनंदी होतील!’

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : गेल्या दीड वर्षांपासून देश कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. कोरोना काळात कोविड योद्धे जीवावर उदार होऊन काम करत आहेत. मात्र, सध्यापेक्षा पहिल्या लाटेत कोरोनाची तीव्रता जास्त होती. कोरोनाची लस उपलब्ध नव्हती अन् नेमके उपचारही माहित नसल्याने संकट अधिक गडद झाले होते. लॉकाडाऊनमुळे देशभरातील नागरिक घरात होते. मात्र, कोरोना योद्धे समर्पित भावनेने काम करत होते. या योद्ध्यांप्रती आदर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिवे लावून आणि टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, यावरून विरोधकांनी याची खिल्ली उडवत मोदी सरकारला टार्गेट केले. दिवे लावून, थाळ्या बडवून कोरोना गेला का अशी उपाहासात्मक टीका करण्यात आली. मात्र, यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरांमध्ये दिवे लावण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लखनऊमध्ये न्यू अर्बन इंडिया या विषयावर आयोजित तीन दिवसीय कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने ‘प्रधानमंत्री आवास शहरी योजने’च्या ७५ हजार लाभार्थ्यांना डिजिटल माध्यमातून घरे सुपूर्द केली. इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी सुरुवात केली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी उपस्थित होते.

यंदाच्या दिवाळीत १८ लाख दिवे लावण्याचे मोदींनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळालेल्या लाभार्थ्यांना मोदींनी तसे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसोबतच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केले. तसेच दिवाळीत प्रत्येकी एका घराच दोन दिवे लावावेत असे सांगितले.

मोदी म्हणाले की, ‘यंदा दिवाळीत आयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लावणार असल्याची माहिती मला योगी सरकारने दिली आहे. पण मी उत्तर प्रदेशला आवाहन करतोय की राज्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरे मिळाली आहेत, त्या ९ लाख लाभार्थ्यांनी आपापल्या घरांत प्रत्येकी दोन दिवे लावावेत. म्हणजे अयोध्येत साडेसात लाख दिवे लागतील. तेव्हा या घरांमध्ये १८ लाख दिवे लावले जातील. भगवान रामालाही याचा आनंद होईल.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!