कल्याण : पोलिसांचे वचक नसल्याने ठाण्यातील कल्याण परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय येथे अंमली पदार्थाचीही सर्रास विक्री सुरू आहे. हे गैरप्रकार तत्काळ रोखण्यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आज मंगळवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर मानपाडा येथे आले होते. यावेळी दरेकरांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळीही कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थाची विक्री केली जाते याकडे आमदार गायकवाड यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही कोणती कारवाई झाली नाही.
दरम्यान, आज आमदारांच्या नेतृत्वाखाली काटेमानिवली पूलाजवळ वाढती गुन्हेगारीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पूलापासून पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हेगारांचे मित्र असून गुन्हेगारांसोबत ते मद्यप्राशन करीत असल्याचा गंभीर आरोपही आमदार गायकवाड यांनी यावेळी केला.
दिलीप वळसे पाटील झोपलेले आहेत का?
मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आले, परंतु मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न असल्याचा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- “मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


