🕒 1 min read
मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन देशाभरातून संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारसह केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दुपारी सव्वा चार वाजता ही भेट होणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे. यापूर्वीही संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील चर्चेचा एक फोटोही चांगलाच चर्चिला गेला होता. त्यानंतर आज होणारी भेटही राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.
लखीमपूर हिंसाचारामुळे देश हादरला आहे. प्रियंका गांधी यांना यूपी सरकारनं अटक केलीय. विरोधी नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात येतोय. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे, असं राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधी यांना दुपारी सव्वा चार वाजता भेटणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
#LakhimpurKheriViolence has shaken the nation,@priyankagandhi has been arrested UP govt, opposition leaders are being restricted from meeting farmers. There is need for joint opposition action against oppression by Government in UP. Meeting @RahulGandhi at 4.15 pm today
जय हिंद!— Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2021
लखीमपूरमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. त्यात एक जीप शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक बड्या नेत्यांनी हा व्हिडीओ ट्वीट करुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय. इतकंच नाही तर दोन दिवसांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची होणारी भेट महत्वाची मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- “मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
