Share

‘शिवसेना भाजपबरोबर ठरलेले लग्न मोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पळून गेली अन्..’

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : आज मंगळवारी दि. ५ रोजी रयत क्रांती संघटनेकडून उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानिमित्त सदाभाऊ खोत सोलापूरला आले होते. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

२०१९ साली विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने ठरलेले लग्न मोडले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पळून गेली. महायुतीने लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली. त्यात जनतेने महायुतीला आशीर्वादही दिला. पण निकाल लागल्यानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली. भाजपबरोबर ठरलेल लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली आणि मोकळी झाली अशी बोचरी टीका त्यांनी केली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे एक जोकर आहे. महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे राज्यात अतिवृष्टीमुळे जे संकट उभे टाकले आहे, त्यासाठी पंचनामे न करता सरसकट तातडीने खरीप पिकाला ६० हजार आणि बागायती पिकाला एक लाख रुपये प्रतिएकर अनुदान द्या, अशी मागणी सदाभाऊंनी केली.

तर दुसरीकडे सोमवारी देगलूर येथे भाजपच्या मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी मतदारांना अजब आवाहन केले. ‘महाविकास आघाडी सरकारमधील लोक नोटा मोजून थकली आहेत. या पोटनिवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा ठेवा. हे शपथ मागतात तेव्हा खोटी शपथ घ्यायची. मशीनने मोजलेले पैसे घ्यायचे, पण मतदान साबणेंना द्यायचे, असे अजब आवाहन त्यांनी केले. ‘ठाकरे सरकारने अगोदर शेतकऱ्यांना मदत द्यावी, मग मतदान मागावे. घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्षे बोंबलत बसा असे होऊ देऊ नका’, असा सल्लाही सदाभाऊंनी मतदारांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!