Share

पंतप्रधान मोदींनी ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच गुण मला जास्त आवडतो-खा.प्रीतम मुंडे

Published On: 

🕒 1 min read

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आतापर्यंत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला सर्वाधिक आवडतो, असे वक्तव्य बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रीतम मुंडे बोलत होत्या.

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. मात्र, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे म्हटले आहे.

त्या म्हणाल्या, ‘पंतप्रधान मोदी यांचा मला सगळ्यांत आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याविषयी त्यांच्यावर टीका झाली. पण जो माणूस आपलं काम करतो, तो आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही व्यक्तीबाबत चांगले बोलणारे दहा जण असले तर टीका करणारे २ जण असतात. आपण विचलित न होतं आपलं काम करत राहणे महत्त्वाचं असते, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त बीड येथे शुक्रवारी भाजपतर्फे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींचा खासदार मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे राज्यभर सेवा समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बीड येथे भाजपतर्फे केंद्र सरकारच्या विविध योजनेतील लाभार्थींचा सन्मानपत्र आणि मिष्ठान्न देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार मुंडे म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसामान्यांच्या उत्थानासाठी अनेक योजना राबवत आहेत. देशाचा प्रधानसेवक म्हणून जनसामान्यांची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस केंद्र सरकारच्या विविध योजनेतील लाभार्थींचा सन्मान करून साजरा केल्याने आजच्या दिवसाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे.देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य त्यांच्या हातून अविरत घडो आणि आम्हाला या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा व सन्मान करण्याची संधी मिळत राहो’ असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!