नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील.
ही निवडणूक जिंकल्यानंतर बायडेन यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. यामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत जो बायडेन यांचं अभिनंदन केलं आहे.
ट्विटरवर एक फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आपल्या नेत्रदीपक विजयावर! व्हीपी म्हणून, भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी आपले योगदान महत्त्वपूर्ण आणि अमूल्य होते. भारत-अमेरिकेच्या संबंधांना आणखी उंचावर नेण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची अपेक्षा करतो.
Congratulations @JoeBiden on your spectacular victory! As the VP, your contribution to strengthening Indo-US relations was critical and invaluable. I look forward to working closely together once again to take India-US relations to greater heights. pic.twitter.com/yAOCEcs9bN
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
अमेरिकेचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. बायडेन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला होता. मात्र या पावसातही बाइडेन यांनी जोरदार भाषण केले. गर्दी जमून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यो बायडन यांची ही सभा त्यांच्या विजयासाठी महत्वाची ठरली.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाचा मशाल मोर्चा म्हणजे कायद्याचा भंग; गुणरत्न सदावर्ते यांची टीका!
- शिवसेनेच्या काळात एसटी महामंडळाची वाट लागली, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा घणाघात
- टीकेची झोड उठल्यानंतर अखेर गोव्यातील सनबर्न फेस्टिवल रद्द !
- ‘… तर मराठा आरक्षणासाठी आता अख्खं मंत्रालय जाळून टाकू’
- पु.ल. देशपांडे यांना गुगलची डुडलद्वारे मानवंदना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

