टीम महाराष्ट्र देशा : पु.ल. देशपांडे यांची आज 101 वी जयंतीनिमित्ताने गूगलचे खास डूडल . गुगलने एक खास डूडल साकारत त्यांना मानवंदना दिली आहे. गुगलने साकारलेल्या या डूडलमध्ये पुलं हे हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या मागे विविध रंगांची उधळणही केल्याचं दिसत आहे. या खास डूडलने त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते.
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते.
त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाचा मशाल मोर्चा म्हणजे कायद्याचा भंग; गुणरत्न सदावर्ते यांची टीका!
- शिवसेनेच्या काळात एसटी महामंडळाची वाट लागली, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा घणाघात
- टीकेची झोड उठल्यानंतर अखेर गोव्यातील सनबर्न फेस्टिवल रद्द !
- ‘… तर मराठा आरक्षणासाठी आता अख्खं मंत्रालय जाळून टाकू’
- मुक्काम वाढला!, अर्णबची आजही सुटका नाहीच


