Share

‘फडणवीसांना गोवा, युपी आणि गुजरातमध्ये पाठवावं, महाराष्ट्रात त्यांची आवश्यकता नाही’

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते हे देखील कोकणामधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेत आहेत. तर, कोकणाला मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरून देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांच्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘फडणवीसांना गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाठवावं, महाराष्ट्रात कोरोना हाताळण्यासाठी त्यांची आवश्यकता नाही,’ असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

‘देवेंद्र फडणवीस सातत्याने अस्वस्थ आहेत. सरकार घालवण्यासाठी दीड वर्षात अनेक प्रयत्न करूनही ते शांत बसलेले नाहीत. कोरोना काळ ते चक्रीवादळाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी फिरत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये शेकडो मृतदेह गंगा नदीकिनारी पुरले गेले. गुजरातमध्ये ७१ हजार मृत्यू लपवले गेले. गोव्यात ४ दिवस सलग ऑक्सिजन अभावी ९० लोकांचे मृत्यू झाले. या तिनही राज्यांमध्ये झालेली मृत्यूची लपवालपवी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यावर उपाययोजना करण्यासाठी हा दौरा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून निवड करावी आणि त्यांना तिकडे पाठवावं. महाराष्ट्रात कोरोनाची संख्या कमी होत असून आमच्या राज्यात कोरोनासाठी त्यांची आवश्यकता नाही,’ असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!