Share

पंतप्रधान मोदी ठरले आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय नेते; अतुल भातखळकरांनी केले कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जागतिक स्तरावरील अ‍ॅप्रूव्हल रेटिंग या सर्वेक्षणामध्ये प्रथम स्थान मिळाले आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले आहे. यात मोदी ७१ टक्क्यांनी प्रथम स्थानावर आहेत. त्यामुळे सर्वाधिक लोकमान्यता असणारे नेते म्हणून नरेंद्र मोदी प्रथम स्थानावर आहेत. दरम्यान यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतर राष्ट्रीय स्तरावरची लोकप्रियता ७१% पसंतीने अत्युच्च शिखरावर आहे. आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन यांना देखील मागे टाकलेले आहे. नरेंद्र मोदींचे मनःपूर्वक अभिनंदन. असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान नरेंद्र मोदींनी या यादीत १३ नेत्यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सहाव्या स्थानी आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!