पंढरपूर : देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोमवारी भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी पंढरपूर येथील नागरिकांनी तीन गोष्टी आशीर्वादाच्या माध्यमातून मागितल्या. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरुपात उपस्थिती लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मराठीमध्ये आपल्या भाषणाला सुरूवात केली. या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासाला देखील चालना मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. पंढरपूरला जोडणाऱ्या या महामार्गासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले. ‘मी सर्व वारकऱ्यांना नमन करतो, कोटी कोटी अभिवादन करतो,’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांचं अभिनंदन केलं.
तसेच मला तुमच्याकडून तीन आशीर्वाद हवे आहेत. त्या तीन गोष्टी तुम्ही देणार ना? असा मराठीत सवाल करत मोदींनी तीन गोष्टींची हमी पंढरपुरकरांकडून घेतली. दोन्ही पालखी मार्गाचं निर्माण होत असतानाच त्याच्या आजूबाजूला सावली देणारे डेरेदार वृक्ष लावा. मार्गालगतच्या गावातील गावकऱ्यांनी ही जबाबदारी घ्या. मला तुमच्याकडून हा पहिला आशीर्वाद हवा आहे. दुसरा आशीर्वाद म्हणजे या रस्त्यांच्याकडेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्याऊ बनवा. २१ दिवस भक्त वारीला येतात. वारीत तल्लीन होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी जागोजागी असायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि सुंदर तीर्थक्षेत्रं म्हणून पंढरपूरचा विकास करा. भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर तीर्थस्थळ म्हणून पंढरपूरचा लौकीक वाढला पाहिजे, असं मोदी म्हणाले.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यांत, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यांत ३८४ कोटी रुपये खर्चून होणार आहे. पालखी मार्गाचे भूमिपूजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. रस्ते हे विकासाचे द्वार असतात, पण, हे पालखी मार्ग हे पवित्र मार्गाकडे जाणारे महाद्वार ठरतील, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा- प्रविण दरेकर
- एका महिलेचे नाव लोकांसमोर आणून खूप चांगले काम केलेस मित्रा’, वानखेडेंचा मलिकांवर निशाणा
- मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर क्रांतीचे संतप्त प्रत्युत्तर, ‘माझी बहिण पीडित आहे आणि..’
- एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने रडीचा डाव खेळू नये-आ.विनायक मेटे
- ‘…आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत’, धनंजय मुंडेवर फडणवीसांचे टीकास्त्र


