🕒 1 min read
मुंबई : आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप रविवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. यानंतर आता मलिक यांनी समीर वानखेडे यांची मेहुणी म्हणजेच क्रांती रेडकर यांच्या बहिणीला या प्रकरणात ओढले आहे.
नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडेंना सवाल केला आहे. ‘समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या त्याचा पुरावा’, असं म्हणत मलिकांनी काही स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केले आहेत. ‘ती महिला कोण? तिच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं’, असेही मलिक म्हणालेत.
यावर क्रांती रेडकर हिने मलिक यांनी केलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या अनुषंगाने क्रांतीने एक ट्विट केले आहे. त्यात ती म्हणते की, ‘डियर मीडिया, मला माहिती आहे की, नवाब मलिक यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या एका ट्विटमुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. पण मी हे सांगू इच्छिते की, या प्रकरणात माझी बहीण पीडित होती आणि पीडित आहे.’
Will give more updates regarding the same through my twitter handle ???????? pic.twitter.com/c0aspjowUr
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) November 8, 2021
‘आमच्या लीगल टीमच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे हा समजुतदारपणा ठरणार नाही. माझी बहीण मलिक यांच्या ट्विट विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. परंतू समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये’ असे क्रांतीने स्पष्ट केलेय.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोविड-१९’मुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी- संजय राऊत
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- ‘अशाने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढतोय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
