🕒 1 min read
मुंबई : राज्यात सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संप न करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. आज सकाळी पुन्हा यासंदर्भात सुनावणी पार पडली. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकार अभ्यास समिती स्थापन करणार आहे.
आज दुपारी समितीचा जीआर जारी करण्यात येणार आहे. मात्र, एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत. राज्य सरकारकडून जोपर्यंत लिखित स्वरुपात येत नाही तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची भूमिका एसटी कामगार संघटनांनी घेतली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावरुन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
‘राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा. विलीनिकरणाच्या बाबतीत आता कर्मचारी कोणाचंही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे युनियनने जरी सरकारशी हात मिळवणी केली असेल तरीही आता कर्मचाऱ्यांनी आंदोलन हातात घेतलं आहे. म्हणून आता स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन पेटलं आहे. सरकारने हे आंदोलन टोकाला जायच्या अगोदर विलीनिकरणाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी. विलीनकरण होणार की नको यासाठी समिती नको. विलीनीकरण कशा पद्धतीने करता येईल, यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि सरकारने जर ते केलं नाही तर मला नाही वाटत की महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आता कोणाचं ऐकेल’, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
राज्य सरकार असंवेदनशील आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या विषयाला ज्या गांभिर्याने घेण्याची आवश्यकता दुर्दैवाने ते होत नाही, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सध्याची अवस्था म्हणजे मंत्री तुपाशी अन् कर्मचारी उपाशी’
- एसटी संपाबाबत हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
