Share

पोलिस असल्याचा बनाव करत दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाण वाढले

Published On: 

नांदेड : शहरात दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. हे चोर पोलीस बनून येतात आणि ऐवज घेऊन पसार होतात. यामुळे सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे की स्वत: चा बचाव कसा करायचा. १७ फेब्रुवारी रोजी पोलीस आहोत असा बनाव करुन तोतया पोलिसांनी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला गंडवले. यामुळे पोलिस प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहीले आहे.

लोकमित्रनगर येथील रहिवासी पिराजी वावळे हे बुधवारी सकाळी आकराच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यास छत्रपती चौकात गेले होते. या दरम्यान काही अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आले. यावेळी त्यांनी आपण पोलिस असल्याचे वावळे यांना सांगितले. आपले बनावट ओळखपत्र दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी वावळे यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची चेन आणि १२ हजार रुपयांची आंगठी काढून घेतली. आणि वावळे यांची नजर चुकवून काही वेळातच ते पसार झाल्यानंतर वावळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

तर दुसऱ्या घटनेत याच ठिकाणी भाजीपाला खरेदी करताना धनराज भारती यांचा साडेआकरा हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी पळविला. मोबाइल चोरीच्या घटना छत्रपती चौकात मागील अनेक दिवसापासुन वाढल्या आहेत. या दोन्ही प्रकारणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक नरवडे हे करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!