Share

ग्रेटा थनबर्गने दिशा रविच्या समर्थनार्थ लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा केला उपस्थित

Published On: 

वॉशिंग्टन : ट्विटर टूलकिट प्रकरणी दिशा रविला अटक करण्यात आल्यानंतर आंततराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरण ग्रेटा थनबर्गने  प्रथमच आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.  ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिटमध्ये बदल करून ते पुढे पाठवल्याचा आरोप दिशा रविवर ठेवण्यात आला आहे. दिशा रविला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, ग्रेटा थनबर्गने दिशा रविच्या समर्थनार्थ लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करून ट्विट केले आहे. दिशा रविच्या अटकेनंतर ग्रेटा थनबर्गची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

ग्रेटा थनबर्ग ट्विट करून म्हणाली, अभिव्यक्तीचे स्वातंत्र आणि एकत्रितपणे शांततेत आंदोलन करणे हा वादातीत मानवाधिकार आहे. हे लोकशाहीची मूलभूत अंग असायलाच हवे, असे ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय हे ट्विट करताना तिने #StandWithDishaRavi या हॅशटॅगचा वापरही केला आहे. एक प्रकारे ही टीका असून, भारतातील लोकशाहीवर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आहे, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, दिशा रवीला अटक केल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. मात्र, ती तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तसेच तपासादरम्यान ती उडवाउडीवीच उत्तरं देत असून आपल्या सहकाऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पोलिसांनी यापूर्वी कोर्टाला सांगितलं आहे. तिचे सहकारी मुकुल आणि जैकब यांना 22 फेब्रुवारी रोजी तपास संस्थेसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलंय. त्यासाठी पोलिसांनी तशी याचिकासुद्धा केली आहे. याच याचिकेचा विरोध दिशा रवीच्या वकिलांनी केला असून दिशाला मुक्त करण्याची मागणी तिच्या वकिलांनी केला आहे. याच याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!