पुणे : आमचे सरकार सत्तेवर असताना पेट्रोल दर वाढीच्या मुद्यावर तुम्ही सरकारवर टीका केली होती. आता मोदी सरकार सत्तेत आहेत, पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही मोदी सरकारवर टीका करा. नसता तुम्हाला तुमचे काम करू देणार नाही, असा इशाराच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.
यूपीए सरकारवेळी पेट्रोलचे दर वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी टीका केली होती. आता तिच परिस्थिती आहे. देशात पेट्रोलचे भाव शंभरीवर गेले आहेत. असे असताना ते दोघेही काहीच बोलत नाहीत. म्हणून त्यांच्या चित्रपटांचे शुटिंग राज्यात होऊ देणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नानांच्या मनात जे आले असेल ते बोलून गेले. ते महत्त्वाच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना जे योग्य वाटतेय ते त्यांनी केले. पेट्रोल दरवाढीला तत्कालिन सरकार जबाबदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘एकमेकांवर टोलवाटोलवी करून चालत नाही. मागच्यांनी काय केले, हे सरकारने सांगण्यात काडीमात्रही अर्थ नाही. तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय. मागच्यांनी केलेल्या चुका दुरूस्त करून लोकांना कशी मदत होईल, हे त्यांनी पाहिले पाहिजे.’
महत्वाच्या बातम्या
- नांदेडमध्ये पेट्रोलच्या दराने ओलांडली शंभरी; परभणीत पुन्हा उडाला पेट्रोलचा भडका
- ‘जात महत्त्वाची नसून…’, रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत, कलाकारांनी देखील केलं लाईक
- आयपीएलच्या लिलावानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूला पडलेला प्रश्न, १५ कोटी म्हणजे किती?
- गारपिटीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या : आ. संतोष दानवे
- लिलावात बोली लागल्यानंतर इंग्लंडच्या ‘या’ महिला खेळाडूने केले अर्जुनचे कौतुक


