🕒 1 min read
मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (K. Chandrashekhar Rao met Chief Minister Thackeray) यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचीही उपस्थिती होती. मात्र त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अजून स्पष्टता मिळाली नाही. मात्र यानंतर चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकारणात चर्चा रंगली आहे.
या भेटीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी देशाच्या राजकारणाबाबत आणि परिस्थितीबाबत मी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. देशाच्या विकासावर आणि येणाऱ्या काळातील दिशेबाबत चर्चा झाली. तसेच या सर्व विषयांबाबत एकमत झाले असल्याचे देखील राव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पुढे बोलताना चंद्रशेखर राव म्हणाले, देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशातल्या युवकांना देशातला महोल नाही खराब केला पाहिजे. अशी आमची अपेक्षा आहे. इतर पार्टीच्या लोकांशीही आम्ही एकत्र काम करण्याबाबत बोलणार आहोत. महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा देशात क्रांती घडवतो. एक चांगली सुरूवात आम्ही इथून करत आहोत, असेही राव यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
-
आमच्या बैठकीचा चांगला परिणाम लवकरच पाहायला मिळेल- के. चंद्रशेखर राव
-
के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; तेजस ठाकरेंची उपस्थिती चर्चेत
-
‘आपल्याच देशात भगवद् गीतेच्या पठणाला विरोध…’; आमदार नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
