कोल्हापूर : कोल्हापूरच्या बांबवडे गावात मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. यानंतर बांबवडे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परवानगी घेऊन पुतळा बसवावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. तर आता बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करु, या भूमिकेवर शिवभक्त ठाम आहेत.
कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात बांबवडे नावाचं गाव आहे. या गावात शिवरायांचा एकही पुतळा नव्हता. त्यामुळे अज्ञातांनी रविवारी मध्यरात्री शिवरायांचा पुतळा चौकात बसवला. मात्र या कोणत्याही परवानगीशिवाय हा पुतळा बसवल्याने तो हटवून पुन्हा परवानगी घेऊन पुतळा बसवावा, असं मत प्रशासनाचं आहे.
दरम्यान, आता प्रशासन ज्या पद्धतीने आदेशाला बांधिल आहेत, त्याचप्रमाणे शिवभक्त म्हणून हा पुतळा इथेच ठेवणं, तो न हटवणं यासाठी आम्ही बांधिल आहोत. पद्धत चुकीची असली तर पुढच्या परवानग्या आम्ही घेऊ. पण महाराजांचा पुतळा बसवलेलं ठिकाण चांगलं आहे. कोणतीही अडचण भासणार नाही. पोलीस स्टेशनच्या दारात पुतळा बसवला आहे.
त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा पुतळा सुरक्षित आहेत. पुतळ्याची विटंबना होणार नाही, याची जबाबदारी घेण्यास आम्ही तयार आहोत. भलेही आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण पुतळा इथून हटवू देणार नाही, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल
- दिग्गज अभिनेत्रीने कॉंग्रेसला ठोकला राम-राम ; भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
- देशात 60 लाख कोविड रुग्ण झाले बरे; अर्ध्याहून अधिक रुग्ण ‘या’ पाच राज्यातले
- कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सातत्याने घसरण सुरूच; बरे होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ


