Share

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रत्नागिरी दौऱ्यावर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावाला देणार भेट

Published On: 

रत्नागिरी : भारताचे राष्ट्रपती डॉ.रामनाथ कोविंद(Ramnath Kovind) हे उद्या(१२ फेब्रु.)रत्नागिरी दौऱ्यावर येणार असून यावेळी ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळगावाला देखील भेट देणार आहेत. दरम्यान, या दौर्‍याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी कामाला लागले असून मंडणगड तालुक्याला काही प्रमाणात लष्करी छावणीचे स्वरूप आल्याचे बघायला मिळत आहे.

राष्ट्रपतींच्या स्वागताची जंगी तयारी सुरु झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंडणगड शहरापासून चार किलोमीटर लांबीवर असलेल्या शिरगाव येथील मोकळ्या मैदानात पक्के डांबरीकरण केलेले हेलिपॅड निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण दौऱ्यावर पोलिसांसह गुप्तचर यंत्रणाची बारीक नजर असणार आहे.

दरम्यान, यापूर्वी महापरिनिर्वाणदिनी राष्ट्रपती महामानावाला अभिवादन करण्यासाठी आंबडवे या गावी येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!