मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेत बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचा दावा केला होता. यावरच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 1857 च्या लढ्यातही फडणवीसांचे मोठे योगदान असल्याचा टोला लगावला होता. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. मात्र आता यावरूनच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरूखकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
“फडणविसांच्या च्या रक्षणार्थ त्यांच्या गुणवंत अर्धांगिनी धडपडत असताना चित्रा वाघ ताई तुम्ही त्यांच्यापेक्षा सवाई बनायला का बघताय? त्यापेक्षा तुमच्या घरगुती साहेबांच बघा काय ते!असं नको व्हायला की लोक म्हणायला लागतील…अमृता_से_चित्रा_सवाई”, असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.
फडणविसांच्या च्या रक्षणार्थ त्यांच्या गुणवंत अर्धांगिनी धडपडत असताना @ChitraKWagh ताई तुम्ही त्यांच्यापेक्षा सवाई बनायला का बघताय,त्यापेक्षा
तुमच्या घरगुती साहेबांच बघा काय ते !असं नको व्हायला की लोक म्हणायला लागतिल #अमृता_से_चित्रा_सवाई !@ShivsenaComms @ShivSena pic.twitter.com/HwjB7We2Gm— Sheetal Swapnil Sheth (@SheetalSheth_) May 3, 2022
चित्रा वाघ यांचे ‘ते’ ट्वीट-
“१८५७ च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल इति आदित्य ठाकरे. बाकी बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से बेटा सवाई दिसतोय.”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.
दरम्यान १८५७ च्या लढ्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा, या वादात जाण्यापेक्षा राम मंदिर बाबत कोर्टाने निकाल चांगला दिला आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
- अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; अटकेची दाट शक्यता
- IPL 2022 GT vs PBKS : पंजाबला चिरडण्यासाठी सुसाट गुजरात सज्ज! वाचा हेड-टू-हेड आकडेवारी
- “…त्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचला”, गृहमंत्र्यांचे आदेश
- IPL 2022 KKR vs RR : राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्यांदा पराभूत; संजू सॅमसननं ‘यांच्यावर’ फोडलं पराभवाचं खापर!
- “हर्षदानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला”, अजित पवारांनी केले कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

