औरंगाबाद : कन्नड तालुक्यात शेतक-यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अतिशय महत्वाचा आहे. तालुक्याचे खरीप हंगामाचे सरासरी लागवड क्षेत्र अंदाजे ९९ हजार ८३१ हेक्टर आहे. तालुक्यात कापुस, मका, तुर, सोयाबीन, आद्रक, भाजीपाला इत्यादी महत्वाची पिके आहेत. कापसाचे साधारण ४६ हजार ९३३ हेक्टर क्षेत्र, मका पिकाचे ३३ हजार ७८१ हेक्टर क्षेत्र, तुर पिकाचे २ हजार ७३९ हेक्टर, सोयाबीन ८०५ हेक्टर, आद्रक ६ हजार ३३० हेक्टर व भाजीपाला २ हजार हेक्टर क्षेत्र आहे.
यावर्षी कापसाचे अंदाजीत मागील वर्षाएवढे लागवड क्षेत्र राहिल. मागील दोन तीन महिन्यात सोयाबीनचे वाढते बाजार दर पहाता तालुक्यातील शेतक-यांचा कल सोयाबीन पेरणीकडे वाढता आहे. तसेच इतर कडधान्ये तुर, उडीद, मुग या पिकांचे पेरणी क्षेत्र देखील वाढणार आहे. मकाचे चालु वर्षी बाजारा भाव कमी असल्यामुळे तसेच फवारणी खर्च वाढल्यामुळे शेतक-यांचे मका लागवडीकडील कल कमी दिसुन येत आहे.
चिंचोली मंडळ तसेच कन्नड मंडळामध्ये मिरची लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे. तसेच भाजीपाला क्षेत्र वाढलेले आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झालेमुळे तालुक्यातील पुर्व हंगामी तसेच सुरु उसाचे लागवड क्षेत्र वाढलेले आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने आवश्यक बियाणे, खते व किटकनाशके यांचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकांच्या उगवण बाबत ब-याच तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे यावर्षी शेतक-यांनी घरचे बियाणे वापरावे तसेच बियाण्यांची उगवण क्षमता तपासुन पेरणी करावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
खरीप पिक उत्पादकता वाढ अभियान
– सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी व बिज प्रक्रीया मोहिम,
– माती परिक्षण आधारित रासायनिक खतांचा संतुलित वापर,
– बी.बी.एफ (रुंद सरी व वरंबा) तंत्रज्ञानाद्वारे पिकांची पेरणी,
– १० टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करुन इतर सेंद्रीय व हरित खताचा वापर,
– शेतक-यांचे घरचे स्वत: कडील बियाणे वापर
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

