मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आई झाली असून तिच्या घरी जुळी मुले जन्माला आली आहेत. याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती दिली आहे. या दोन मुलांची नावे तिने जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ अशी ठेवली आहेत. 46 वर्षीय प्रीतीच्या दोन्ही मुलांचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. प्रितीने 2016 मध्ये तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लग्न केलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चांगली बातमी शेअर करताना प्रितीने लिहिले की, ‘मला आज तुम्हा सर्वाना ही चांगली बातमी सांगायची होती. जीन आणि मी खूप आनंदी आहे. आम्ही आमच्या जुळ्या मुलांचे जय झिंटा गुडनफ आणि जिया झिंटा गुडनफ आमच्या कुटुंबात स्वागत करतो. आमच्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. या अविश्वसनीय प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेट्सचे मनःपूर्वक आभार. खूप प्रेम – जीन, प्रीती, जय आणि जिया.’
Hi everyone, I wanted to share our amazing news with all of you today. Gene & I are overjoyed & our hearts are filled with so much gratitude & with so much love as we welcome our twins Jai Zinta Goodenough & Gia Zinta Goodenough into our family. pic.twitter.com/wknLAJd1bL
— Preity G Zinta (@realpreityzinta) November 18, 2021
सरोगसीचा मार्ग निवडणारी प्रीती झिंटा ही पहिली सेलिब्रिटी नाही, याधीही करण जोहर, सनी लिओन आणि एकता कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सरोगसीद्वारे पालक बनले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजाला माझी कमजोरी माहीत आहे’; रोहित शर्माचा खुलासा
- ‘अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारची भूमिका संशयास्पद
- ‘शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद द्या, पण युतीचं सरकार स्थापन करा’
- रोहित-राहुलच्या ‘पदार्पणात’ टीम इंडियाचा मोठा विक्रम; T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियालाही टाकले मागे
- ‘तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांवर अॅक्शन घ्याल त्याला रिअॅक्शन मिळाल्यास आम्हाला दोष देऊ नका’


