Share

उगाच धमक्या देण्यापेक्षा सत्तेच्या बाहेर पडून दाखवा,पटोलेंना राष्ट्रवादीने सुनावले खडेबोल

Published On: 

मुंबई – काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने युपीएचं नेतृत्व बदलाची वक्तव्य करत आहेत. युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असं ते सातत्याने म्हणत आहेत. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान,याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. काँग्रेसने मात्र राऊत यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत हे त्यांनी जाहीर करावं, अशी मागणी केली आहे.

संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल, राज्यातील ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलेय, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे असा इशारा दिला आहे. तसेच राऊतांनी युपीएसाठी शरद पवारांची वकीली बंद करावी असेही बजावले आहे.

दरम्यान, शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरु असताना आता या वादात राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील यांनी पटोले यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये कुंटे पाटील म्हणतात की, ‘श्री नाना भाऊ पटोले यांनी तारतम्य ठेवून बोलावं अशी अपेक्षा आहे. मा. पवार साहेबांमुळेच आज काँग्रेस राज्यात सत्तेमध्ये आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. उगाच धमक्या देण्यापेक्षा सत्तेच्या बाहेर पडून दाखवाच. मग कळेल सर्व’, असे म्हणत कुंटे पाटलांनी थेट नाना पटोले यांना लक्ष्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!