Share

पोलिसांचा वापर करुन बंद यशस्वी दाखवण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू : दरेकर

Published On: 

मुंबई :- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन  करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.आजच्या बंदला संमिश्र पाठींबा मिळाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान,पोलिसांचे बळ वापरुन राज्यात ठिकठिकाणी जबरदस्तीने बंद करायला लावलं जात असून राज्य सरकारकडून ‘भारत बंद’ यशस्वी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

”पोलिसांचे बळ वापरुन बंद करत असतानाची अनेक उदारहरणं समोर आली आहेत. वरळी नाक्यावर पोलिसांच्या माध्यमातून बंद करायला सांगितलं जात होतं. रायगडच्या महाड येथे एक पोलिस दंडुका हातात घेऊन बंद करायला सांगत असल्याचा फोटो माझ्याकडे आला आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून पोलिसांचा वापर करुन बंद यशस्वी दाखवण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.”असा थेट आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

दरम्यान, आजच्या भारत बंदनंतर उद्या सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. त्यापूर्वीच अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!