पंढरपूर : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना गरजू घटकांसह हातावर पोट असलेल्या (रिक्षाचालक, फेरीवाले, बांधकाम मजूर आदी) नागरिकांसाठी मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान, या पॅकेजवर भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘ठाकरे सरकारकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा होता. हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये हे सरकार देईल असं वाटत होतं. परंतु या सरकारने काहीच दिलं नाही. जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली. जुन्याच योजना नव्याने आणल्या सारख्या दाखवल्या,’ अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शालेय मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा मुख्याध्यापकांनाच आर्थिक भुर्दंड!
- ठरलं! ‘या’ तारखेला ठाकरे सरकार पडणार, चंद्रकांत पाटलांचा दावा
- महत्त्वाचे! लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वाहतुकीला पासची गरज नाही
- ‘खबरदार! ..तर आम्ही काठीचा वापर करणार’, पोलीस महासंचालकांचा इशारा
- ‘किमान आतातरी गोरगरीबांचे वीज कनेक्शन तोडू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

