Share

‘खबरदार! ..तर आम्ही काठीचा वापर करणार’, पोलीस महासंचालकांचा इशारा

Published On: 

मुंबई: राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून १ मे पर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. संचारबंदी लागू होण्यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नियमांच्या अंमलबजावणी बाबत माहिती दिली. जोपर्यंत नियमांचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत लाठीचा वापर होणार नाही, असा इशारा पांडे यांनी दिला. सार्वजनिक मालमत्तेची हानी झाल्यास पोलीस बळाचा वापर करतील, असेही ते म्हणाले. तसेच अत्यावश्यक वाहतुकीस पासची गरज नसल्याचे सांगत पांडे यांनी अत्यावश्यक कामास निघणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व कठोर निर्बंध लावण्यात आलेत. याची पोलीस दलावर सर्वात मोठी जबाबदारी असणारे. आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षिच आहे. नियम आणि अटी लोकांना आता माहिती आहेत. त्यामुळे त्याचे पालन व्हावे. संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. पोलीस दलाला होमगार्ड तसेच एसआरपीएफचेही साह्य मिळणार आहे. राज्यात पोलिसांसोबतच १३ हजार होमगार्ड आणि एसआरपीएफच्या २२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, असे पांडे यांनी नमूद केले.

पांडे म्हणाले, मास्क वापरणे, हात धूत राहणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे ही त्रिसूत्री प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे. आपण नियम पाळले नाहीत तर येत्या काळात स्थिती आणखी गंभीर होणार आहे, याचे भान राखले पाहिजे. सर्वांनी नियमांचे पालन केले तर निश्चितपणे १५ दिवसांच्या आधीच कोरोनाची संख्या कमी होईल. पोलीस दलातील ८१ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून ती आमच्यासाठी जमेची बाजू आहे असे पांडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!