Share

संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा – प्रवीण दरेकर

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या संकटावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. मंदीच्या लाटेने सगळेच गटांगळ्या खातील अशी स्थिती आहे. राज्यकर्ते आत्मसंतुष्ट व आत्मप्रौढीत मग्न असले की, हे असे होणारच! अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहेच. किमान पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचे आहे, असा टोला संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून लगावला आहे.

याला आता विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यस्थेला नीट गती देता येईल, अशी खोचक टीका प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांनी सामनामध्ये लिहलेल्या रोखठोक या सदरातील मजकुरावर जोरदर टीका केली आहे. दरेकर यांनी मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे स्थिर ठेवण्याचं काम केलं. तसेच लोकांसाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं असं सांगितलं.“अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील दहा वर्षात जी प्रगती करु शकले नाहीत, ती प्रगती मोदींनी दीडपट गतीने गेल्या पाच वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला याचं भान संजय राऊतांना नाही. किंवा ते समजून न उमजल्यासारखं करत आहेत, असं प्रविण दरेकर म्हणाले.

पुढे बोलताना दरेकर यांनी राऊत यांनी अर्थव्यवस्थेविषयीचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत असा खोचक टोला लगावला. तसेच मोदी यांनी देशाचा विकासदर जास्त ढासळू दिला नाही, असासुद्धा त्यांनी केला. कोरोनाच्या काळात जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना मोदी यांनी देशाचा विकासदर फक्त वजा 8% पर्यंत ठेवला. तसेच मोदींनी अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींचं पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामळे महाराष्ट्रातल्या गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल, असे दरेकर म्हणले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!