Share

‘सिस्टिम फेल झाल्याने आता ‘जन की बात’ आवश्यक’

Published On: 

नवी दिल्ली : आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधला. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, केंद्र आणि राज्य सरकार आवश्यक उपाययोजना राबवत असल्याचे मोदी म्हणाले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

‘सिस्टम’ फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ करणे महत्वाचे आहे. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी सर्व काँग्रस सहकाऱ्यांना विनंती आहे की, सर्व राजकीय कामे सोडून केवळ लोकांना मदत करा. सर्व प्रकारे देशवासियांचे दुःख दूर करा. काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे असे ट्विट राहुल गांधींनी केलेय.

दरम्यान, केंद्र सरकारकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक राज्यांनी कडक निर्बंध देखील लागू केलेत. पण केंद्र सरकारने राबवत असलेल्या योजनांची प्रसिद्धी देण्याकरिता जाहिराती प्रकाशित केल्यात. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विनंती केली आहे.

‘केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की ‘पीआर’ व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची परिस्थिती असहनीय आहे’ असे ट्विट राहुल यांनी केलेय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!