मुंबई : टीव्हीवर पाहिले की पदेशातून आपल्या देशाला आरोग्य साहित्याची मदत होत आहे. विमाने भरुन येत आहेत. मात्र, त्यातलं महाराष्ट्राला अजून तरी काही मिळालेले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर टीका केली.
जयंत पाटील म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणात लस येत आहे त्या प्रमाणात जिल्ह्यात लसीकरण केले जात आहे. शासन दुसऱ्या डोसला प्राधान्य देत आहे आणि त्याचप्रमाणे प्रशासन नियोजन करत आहे. १३ कोटी जनतेला लस देणे ही मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्वच जास्तीत जास्त लस मिळावी याचा प्रयत्न करत आहोत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते महाराष्ट्रावर टीका करतात त्यांच्या टीकेला आता काही अर्थ उरला नाही कारण पंतप्रधानांनी स्वतः महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारने खरंच चांगली कामगिरी केली आहे. आपण उत्तरेकडील राज्यांशी तुलना केली तर आपल्याला ते दिसेल.’
जयंत पाटील पाटील यांच्या टीकेला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी परदेशातून आलेली मदत कुठे गेली, असा सवाल उपस्थित केला होता. मात्र, त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना विचारावा. कतारमधून वैद्यकीय सामुग्री घेऊन एक जहाज मुंबईत आले होते. या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या मदतीपैकी महाराष्ट्राला काय मिळालं, हा सवाल जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना विचारावा, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला चांगलच ठाऊक ; मुश्रीफांचा टोला
- मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांना लाल दिव्याच्या गाडीची भलतीच हौस!
- धक्कादायक! अफगाणिस्तानच्या शाळेवर बॉम्बहल्ला, ६८ विद्यार्थिनींचा मृत्यू
- कोरोना संकटातही ‘लाईफ सेव्हिंग’ ऑक्सिजनचा काळाबाजार, ४९ सिलेंडर केले जप्त
- ‘कोरोनाचे संकट व संचारबंदी संपल्यावर मराठा समाजाची भूमिका वेगळी असेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

