Share

मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांना लाल दिव्याच्या गाडीची भलतीच हौस!

Published On: 

औरंगाबाद : लाल दिव्याच्या गाडीची बातच काही और असते. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला या गाडीचे आकर्षण असतेच. मात्र सरकारी नियमांनुसार प्रत्येकाच्या गाडीवर हा दिवा नसतो. मात्र अग्निशमन विभागात अशाप्रकारचा दिवा असणाऱ्या अनेक गाड्या आहेत. या दिव्याची हौस बाळगणाऱ्यांनी या विभागाशी संबंध नसताना देखील तेथील वाहन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अग्निशमन विभागातील अशी दोन वाहने पालिका अधिकार्‍यांना दिलेली असल्याने या विभागाच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे ही वाहने परत मिळावीत, अशी मागणी अग्निशमनने पालिकेच्या यांत्रिकी विभागाकडे केली आहे

पालिका मुख्यालयाप्रमाणेच मागील काही वर्षांपासून अग्निशमन विभागातील रिक्‍त पदांचीही भरती झालेली नाही. परिणामी, रिक्‍त पदे आणि नव्याने भरती होत नसल्याने या विभागाचे कामकाज सध्या कंत्राटी कर्मचार्‍यांवरच सुरू आहे. शहर व परिसरात आगीची घटना घटल्यास अपुर्‍या यंत्रणेवर जिवाची पर्वा न करता जवान आगी आटोक्यात आणत आहेत. हा विभाग सक्षम करण्याची गरज असताना दुसरीकडे या विभागाकडे असलेली वाहने काढून पालिका अधिकार्‍यांना वापरण्यास दिली जात आहेत.

या विभागाकडे दोन इनोव्हा गाड्या आहेत. यातील एक कार आयुक्त वापरतात. तर दुसरी इनोव्हा कार एका उपायुक्ताला दिलेली आहे. एक बुलोरो जीप कंत्राटी पद्धतीने पालिकेत घेतलेले विशेष वसुली अधिकारी वापरतात. त्यामुळे सध्या अग्निशमन विभागासाठी चांगल्या अवस्थेत असलेली एकच जीप आहे. या जीपचेही काही काम निघाल्यास अन्य वाहन नसल्याने अधिकार्‍यांची अडचण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या प्रशासकीय कारभार सुरू असल्याने अधिकार्‍यांची मनमानी सुरू असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!