नवी दिल्ली : हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या अफगाणिस्तानात मुलींच्या शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. यात आतापर्यंत ६८ हून अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय तर जवळपास सुमारे १०० जणी जखमी झाल्यात. मृत मुली ह्या ११ ते १५ वयोगटातील आहेत. ऐन कोरोना संकट काळातही अफगाणमधील हिंसाचार थांबलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. अमेरिकाप्रणित नाटोचे आंतरराष्ट्रीय सैन्य अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारीत असतानाच देशात पुन्हा एकदा हिंसाचाराने डोके वर काढले आहे.
अफगाणचे गृह प्रवक्ते तारिक अरियान म्हणाले की, देशाची राजधानी काबूलच्या पश्चिमेकडील शियाबहुल भागात असलेल्या सईदा अल शाहदा या मुलींच्या शाळेवर अतिरेक्यांनी बॉम्बवर्षाव केला आहे. शाळा सुटल्यानंतर मुली मोठ्या संख्येने बाहेर पडल्या. तेव्हा शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तीन साखळी बॉम्बस्फोट घडले. स्फोटकांनी खचााखच भरलेल्या कारचा पहिला स्फोट झाला. त्यानंतर सलग दोन बॉम्बस्फोटांची प्रचिती आली. त्यामुळे एकच खळबळ माजली.
या स्फोटांच्या मालिकेत ६८ मुली मरण पावल्या असून, १०० जणींना दुखापत झाली आहे. यापैकी काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. या हल्ल्यात प्रामुख्याने ‘दश्त-ए-बारची’ भागातील हाजरा समुदायाला निशाणा बनविण्यात आले आहे. हा समुदाय शियापंथीय मानला जातो. या समुदायाचा इसिसला पाठिंबा आहे. स्फोटानंतर शाळेच्या परिसरात मुलींची पुस्तके रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडल्याची दृश्ये पहायला मिळाली, असेही सूत्रांनी सांगितले.
काबूलमध्ये सातत्याने बॉम्बहल्ले घडत असतात; परंतु शियाबहुल शाळेवर झालेला हा हल्ला सर्वात हृदयद्रावक होता. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्विकारली नाही. तसेच या हल्ल्यामागे आम्ही नव्हे, तर कुख्यात ‘इस्लामिक स्टेट’ अर्थात ‘इसिस’चा हात असल्याचे तालिबानने म्हटले आहे. दुसरीकडे, अफगाणमधील एका कट्टरपंथीय मुस्लिम समूहाने शिया मुस्लिमांविरूद्ध युद्धाची घोषणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींनी राज्यपालांना कार्यमुक्त करून मंत्रीपद द्यावे’, नवाब मलिकांचा टोला
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर


