जालना: शहरातील गरीब शहा बाजार परिसरात एका गोदामात साठवलेले तब्बल ४९ ऑक्सिजन सिलेंडर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अंजली मिटकर यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जप्त केले आहेत. एकीकडे ऑक्सिजन आभावमुळे रुग्णांचे मृत्यु होत असून दुसरीकडे ऑक्सिजनचा काळाबाजार होत आहे. या प्रकारामुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जालना शहरातील दोन पत्रकार रविवारी रात्री डी.एस.पी. कार्यालयाच्या दिशेने जात असताना त्यांना गरीब शहा बाजारात अंधारात एका वाहनात ऑक्सिजन सिलेंडर लोड करताना दिसले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता १५ ऑक्सिजन सिलेंडर बेवारस आढळून आले. तर सिलेंडर घेऊन जाण्यासाठी आलेले युवक हे उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी सतर्कता राखत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक अंजली मिटकर यांना तात्काळ फोन करुन या ठिकाणी कुणी ऑक्सिजन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतं का याबाबत माहिती घेतली. परंतु त्या पत्यावर कुणाच्याही परवान्याची नोंदणी नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनतर औषध निरीक्षक अंजली मिटकर यांनी रविवारी रात्री १० वाजता गरीब शहा बाजारात तत्काळ धाव घेतली. त्यानंतर तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि सदर बाजार पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. तिथे शोध घेतला असता एका बंद गोदामात आणखी काही जंबो सिलिंडर आढळून आले. अधिकाऱ्यांनी तात्काळ दोन लोडींग वाहने बोलावून तेथून तब्बल ४१ जंबो सिलिंडर आणि ८ छोटे सिलिंटर असेल लक्षावधी रुपयाचे सिलिंडर जप्त केले. घटना स्थळाचा पंचनामा करुन हे सिलिंडर जालना तहसील कार्यालयात पाठविण्यात आले. हे सिलिंडर कुणाच्या मालकीचे आहेत याचा शोध अधिकारी घेत आहेत. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना सर्रासपणे काळाबाजार सुरु असल्याने जालन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकाडून जास्त पैसे उकळले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोविन अॅपमधील त्रुटी गंभीर; लसीकरणाची प्रक्रिया सर्वांसाठी सोपी आणि सर्वसमावेशक असावी’
- शिष्यवृत्ती परीक्षाही ढकलल्या पुढे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- लसींचा साठा घेऊन पुण्यावरुन वाहन परतले, औरंगाबादला मिळाल्या केवळ १३ हजार लसी!
- ‘मोदींनी राज्यपालांना कार्यमुक्त करून मंत्रीपद द्यावे’, नवाब मलिकांचा टोला
- विधानसभा निवडणुकांत इतका वाईट पराभव का झाला? ; सोनिया गांधींनी व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

