🕒 1 min read
औरंगाबाद: प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किरण जळगाव येथील शेततळ्यात उडी मारून विवाहित तरुणाने आत्महत्या केली असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. शरद उत्तमराव शेळके (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. या पराकारणी शरदच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या तरुणीला व तिच्या सोबत त्याच्या प्रियकराला अटक केली आहे.
शहराजवळील जळगाव फेरण शिवारातील विहिरीत दि.9 एप्रिल रोजी दुपारी शरद शेळके या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गावातील तरुणांच्या मदतीने शरदला बाहेर काढून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, शरदने लिहिलेली आठ ते दहा पानांची एक सुसाईड नोट करमाड पोलिसांना मिळाली. सुसाईड नोटमध्ये शरदने त्याच्या 21 वर्षीय अविवाहित प्रेयसी व तिच्या दुसऱ्या प्रियकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी प्रेमिका आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले आहेत. तिचा प्रियकर अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळात दोषारोप दाखल करणार असल्याचे करमाड पोलिसांनी सांगितले आहे.
तरुणीने आत्ता पर्यंत शरद कडून नऊ ते दहा लाख रुपये उकळले आहेत. शरद ने लिहलेय सुसाईड नोटनुसारशरदने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर साक्षीने त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ३ जानेवारीस साक्षीने कॉल करून शरदला आपले प्रेम संबंध संपले आहेत. माझे दुसऱ्या एकावर प्रेम आहे, त्याच्याकडे पिस्तूल आहे. माझे ऐकले नाही तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिली.
“तिच्यामुळे माझे दोन्ही मुलं उघड्यावर पडली. तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत तिच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका”, असे ही सुसाईड नोट आढळून आले. त्याच्या पश्चात आई -वडील, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री कैलास नगर येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला जेवढी गरज असेल तेवढ्या लसी पुरवण्याचं जावडेकरांचं आश्वासन : अजित पवार
- गेवराईत वाळूमाफियांचा धुडगूस! मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर घातला टिप्पर
- काँग्रेस शासीत राज्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावी – राहुल गांधी
- साष्टपिंपळगावात मराठा आरक्षणाच्या लढाईला धार, आमरण उपोषणाचा एकमेव निर्धार!
- रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा राज्यात खरचं तुटवडा आहे की जाणिवपूर्वक तुटवडा निर्माण केला जातोय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

