Share

सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा प्रताप; ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्याला बेदम मारहाण

Published On: 

सांगली : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका करत आहेत. एकेकाळचे घनिष्ट मित्र असलेले खोत आणि शेट्टी यांच्यातून सध्या विस्तवही जात नाहीये. एकमेकांवर टीका करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. मात्र, आता हा वाद थेट विकोपाला पाहायला मिळत आहे.

सदाभाऊंचा मुलगा तथा रयत क्रांती संघटनेचे युवा कार्याध्यक्ष सागर खोतसह चौघांनी वाळवा तालुक्यातील तांबवे गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकिरण माने या कार्यकर्त्याला सोमवारी रात्री ९ च्या सुमारास बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. माने यांच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कासेगाव पोलिसात सागर खोतसह चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाळवा तालुका युवक आघाडीचा मी अध्यक्ष आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आंदोलन व संघटनेचे काम करतो. या कारणाने रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते माझ्यावर चिडुन होते.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचेवर शेतकरी हितावरुन टिका केलेचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला केला. यावेळी तु सदाभाऊंवर टीका करतोस. तुला मस्ती आली आहे’ असे म्हणून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी भास्कर विष्णु मोरे व विश्वास वसंत जाधव यांनी विरोध केला. परंतु चौघांनी धक्काबुक्की करुन ढकलून दिले .आरडाओरडा केल्यानंतर ते घरातुन बाहेर गेले. या घटनेची तक्रार कासेगाव पोलिसात दिली आहे. याबाबत सागर खोतसह चौघांवर विविध गुन्हे दाखल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!