Share

Prasad Laad | “जनतेच्या कामांना तुम्ही नाकारलं म्हणून…”, भाजप नेते प्रसाड लाड यांची ट्विटद्वारे टीका

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते वरून सरदेसाई हे मराठवाडा दौऱ्यावर होते. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महत्त्वाची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर असेल असं ते म्हणाले. याचवेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर देखील त्यांनी जोरदार टीका केली होती. यावरुन आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तरः

उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपाने शिवसेना फोडली असं वरून सरदेसाई म्हणतात. हे म्हणजे असं झालं गिरे तो भी टांग उपर, अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

तुम्ही जनतेच्या कामांना नाकारले, जनतेने तुम्हाला नाकारले! एवढं सोप्प गणित असताना, स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे प्रकार आता तरी सोडा, असं देखील लाड यावेळी म्हणाले. प्रसाद लाड यांनी ही टीका ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

काय म्हणाले होते वरुन सरदेसाईः

कोणी कितीही प्रयत्न करा मुंबईकर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहातील असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेने गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक वादळे पेलली आहेत. त्यामुळे तीन काय तीस पक्ष जरी एकत्र आले तर काहीही फरक पडणार नाही असं सरदेसाई यांनी म्हटलं होतं. आता लाड यांनी सरदेसाई यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!