Share

परळीमध्ये राष्ट्रवादीचा निर्धार परिवर्तन मेळावा, क्षीरसागर उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – परळीमध्ये आज राष्ट्रवादी निर्धार परिवर्तन मेळाव्याचा समारोप होत आहे. या समारोप मेळाव्याच्या कार्यक्रमाला बॅनर वरून गायब असलेले माजी मंत्री व ओबीसीचे बडे नेते जयदत्त क्षीरसागर उपस्थित राहणार की याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

परळीमध्ये होणाऱ्या या मेळाव्याला आज शरद पवार यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादी उपस्थित राहणार आहे. निर्धार परिवर्तन मेळाव्याच्या व्यासपीठाकडे आज सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री व ओबीसीचे बडे नेते जयदत्त क्षीरसागर उपस्थित राहणार की कार्यक्रमाकडे पाठ फिरवणार या बाबत बीड जिल्ह्यामध्ये उत्सुकता लागली आहे.

आज परळी मध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन मेळाव्याचा समारोप होत आहे. राज्यातील 88 मतदार संघातून हा मेळावा परळीमध्ये होत आहे. समारोपाच्या या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचे शक्तिप्रदर्शन पाहण्यास मिळणार आहे. अवघ्या काही वेळातच हा कार्यक्रम सुरू होईल.

या कार्यक्रमापासून जयदत्त क्षीरसागरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जाते. भाजपाशी जवळीक वाढवली म्हणून राष्ट्रवादीने जयदत्त क्षीरसागरांना दूर ठेवल्याची चर्चा आहे. कार्यक्रमाच्या बॅनरमध्ये क्षीरसागराचा फोटो गायब करण्यात आला होता, मात्र अजून व्यासपीठावरचे बॅनर लावायचे राहिले आहे. त्यात सर्वाचे फोटो असतील असे धनंजय मुंडे यांनी सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. कोणतेही निमंत्रण नसल्याने जयदत्त क्षीरसागर कार्यक्रमाला जाणार नाहीत असा सूर त्यांच्या समर्थकांचा होता. काल रात्रीपर्यंत ते बीडमध्येच होते रात्री उशिरा त्यांनी मुबईकडे कूच केल्याचे समजते. वरिष्ठ पातळीवर त्यांना समजावले गेले असतील तर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत परळीमध्ये दाखल होतात की कार्यक्रम संपेपर्यंत नॉटरिचेबल राहतात याकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!