Share

मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या जावडेकरांना डच्चू दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Published On: 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल करण्यात आले आहेत. दीर्घकाळापासून मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना नारळ देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील राजीनामा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक दिग्गज मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात आता रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरही सामील झाले आहेत. या दोघांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. रवीशंकर प्रसाद आयटी आणि कायदा मंत्रालय तर प्रकाश जावडेकर यांनी आयबी आणि पर्यावरण मंत्रालय सांभाळत होते.

मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर यांच्याकडे वन आणि पर्यावरण मंत्रीपदाचा स्वतंत्र प्रभार होता. त्यानंतर पहिल्या टर्ममध्ये झालेल्या विस्तारात जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले. विशेष म्हणजे स्मृती ईराणी यांच्याकडे असलेलं हे महत्त्वाचं पद जावडेकर यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्याकडे केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. मात्र, अचानक त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

जावडेकरांची केंद्रीय मंत्री म्हणून चांगली कामगिरी राहिली आहे. त्यामुळे कामगिरीच्या मुद्द्यावरून त्यांचा राजीनामा घेतला असावा यात काही तथ्य नाही. त्यांच्याकडे अन्य संघटनात्मक जबाबदारी देण्यात येणार असावी, त्यामुळेच त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असावं, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय राजकारणातील काही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, तिथे त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो, असंही  सांगितलं जात आहे. याशिवाय जातीय समीकरणांचा विचार करून देखील त्यांचा राजीनामा घेतला गेला असेल अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!