Share

अखेर विद्यापीठातील बीकॉमच्या विद्यार्थ्यांना मिळणार न्याय, दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश!

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बीकॉम च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी उत्तीर्ण गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात आला आहे. कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे. चौथ्यांदा हा निकाल बदलत आहे. आतापर्यंत तीन वेळा निकाल बदलण्यात आल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले होते. चुकीचा निकाल जाहीर करणारा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी परीक्षा विभागाला दिले आहेत.

विद्यापीठाने मे महिन्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेतला होता. त्यामध्ये बीकॉम प्रथम वर्षाचा कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात तब्बल ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अन्य विषयांत चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयात कमी गुण मिळालेच कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसहित पालकांनीदेखील उपस्थित केला होता. त्यावेळी कुलगुरूंनी याबाबत प्रा. जयसिंगराव देशमुख, वाणिज्य शाखेचे डॉ. वाल्मीक सरवदे आणि परीक्षा विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील त्या तिघांची उपसमिती नेमली.

या समितीने या संबंधी पडताळणी केल्यानंतर निदर्शनास आले की या विषयाचा पेपर मुळातच अतिशय अवघड काढला होता. या पेपरची उत्तर तालिका बरोबर असली तरी पेपर विद्यार्थ्यांना पेपर सोडवता आला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी नापास झाले. या विद्यार्थ्यांना इतर विषयात मिळालेल्या गुणांचा सरासरी गुण देऊन या विश्वाचा निकाल जाहीर करावा. अशी शिफारस या समितीद्वारे करण्यात आली. मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. याला कारणीभूत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!