Share

औरंगाबादेत उरला केवळ ५०० लसींचा साठा, लसीकरण पुन्हा ठप्प होणार!

Published On: 

औरंगाबाद : लसींच्या तुटवड्यामुळे शहरात वारंवार लसीकरण खंडित होत आहे. मंगळवारी पालिकेकडे दहा हजार लसींचा साठा आला होता. मात्र दिवसभरात हा साठा संपला. शहरातील ३९ केंद्रावर काही प्रमाणात उरलेल्या लसींचा साठा एकत्र केल्यानंतर ५०० लसींचा साठा जमा झाला. त्यातून आज प्रोझोन मॉल या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. तसेच कोवॅक्सिनच्या तीन केंद्रांवर देखील लस मिळत आहे. मात्र कोविशिल्ड लसींचा साठा संपल्यातच जमा आहे. त्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांकडून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र वारंवार लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे. गेल्या आठवड्याभरात केवळ दोन ते तीनच दिवस लसीकरण सुरु होते. आत्तापर्यंत १५, १२, १० हजार अनुक्रमे लसींचा पुरवठा झाला. मात्र लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एकच दिवसात हा साठा संपत आहे. बुधवारी (दि.७) शहरातील प्रोझोन मॉल याठिकाणी लसीकरण सुरु आहे. मात्र ५०० लसींचा साठा उरल्याने दोन ते तीन तासात ५०० लसी संपून जातील.

लसींचा पुरवठा कधी होईल याबाबत अनिश्चितता असल्याने उद्या लसीकरण बंद राहण्याची शक्यता आहे. १८ प्लस नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर मरगळ आलेल्या लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत होता. नागरिक घराबाहेर पडून लस घेण्यास प्राधान्य देतांना दिसत होते. मात्र वारंवार लसींच्या निर्माण होणाऱ्या तुटवड्यामुळे अनेकांना इच्छा असूनही लस मिळत नाही. मात्र याबाबत पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले, वरतूनच पुरवठा होत नसल्याने यात मनपाची कुठलीही भूमिका नाही. जोपर्यंत लसींचा व्यवस्थित पुरवठा होत नाही तोपर्यंत याच पद्धतीने लसीकरण सुरू राहील. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा, प्रत्येकाला लस मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!