Share

‘पहिले कोरोना साथीच आणि आता लसीकरणाच चुकीच व्यवस्थापन’ प्रकाश जावडेकरांचे राज्यसरकारवर ताशेरे

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: कोरोनाची लस आली लसीकरण सुरु होऊन देखील दोन महिने उलटून गेले मात्र अद्याप देखील कोरोना आटोक्यात आला नसून राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान या बैठकी आधी महाराष्ट्राला 54 लाख कोरोनाच्या लसी दिल्या. मग आतापर्यंत केवळ 23 लाख लसींचच लसीकरण का करण्यात आलं? असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.

प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून महाराष्ट्र सरकारला कोरोना लसीकरणावरून फटकारले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 23 लाख लस टोचण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 54 लाख लसी देऊनही अत्यंत कमी लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यात केवळ 56 टक्के लसीकरण करण्यात आलं आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे काल दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे लसीच्या अतिरिक्त साठ्याची मागणी केली आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!