Share

भाजपनंतर आता आंबेडकरही मैदानात उतरणार,ठाकरे सरकारच्या अडचणी आणखी वाढणार

Published On: 

मुंबई  – मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत देशमुख राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

दरम्यान,या सर्व प्रकारानंतर महाविकास आघाडीच्या नेत्याचे तोंडचे पाणी पळाले असून बैठकांवर बैठका घेण्याचा धडाका सुरु आहे. प्रकरण अंगाशी येत असल्याने ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून केवळ भाजपच नव्हे तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे देखील आक्रमक झाली आहे. यासंदर्भात आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आंबेडकर राज्यपालांना भेटून हे सभागृह बरखास्त करू नका पण, हे सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार आहेत. हे चोर, खुन्याचं सरकार आहे असा आरोप देखील आंबेडकर यांनी केला आहे.

महाराष्ट्रातल्या राजकारण – प्रशासनातील गुन्हेगारी तत्व एकत्र येऊन काय करू शकतात? हे आपण पाहतोय. मुंबईच्या माजी पोलीस कमिशनरने १०० कोटी कसे वसूल केले जातात याबद्दल खुलासा केलाय पण, आमच्यादृष्टीने ही रक्कमही कमीच आहे. हे मोठं जाळं तयार झालंय असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!